आमच्या बद्दल
'लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि.,लासलगाव' म्हणजे सन १९७२ मध्ये स्थापन झालेली 'जनता सहकारी बँक लि., लासलगाव' होय. "जनतेची, जनतेने, जनतेसाठी चालवलेली आपली जनता सहकारी बँक लासलगाव, अशा उल्लेखाने नावाजलेली हि बँक म्हणजे जनसमान्यांची बँक आहे.
आमचे लक्ष : सहकार क्षेत्रातील एक अशी संस्था बनणे जी तांत्रिक दृष्ट्या प्रगत, आर्थिक दृष्ट्या भक्कम आणि संतुलित, सामाजिक दृष्ट्या सन्मानित असेल, व आपल्या सर्व सभासदांना सर्व सोई सुविधा पुरविण्य करता सक्षम असेल.
आमची उद्दिष्टे :
१) ग्राहक समाधान आणि विश्वास वाढवण्यासाठी आयटी-सुरक्षा आणि आयटी-सेवा, व पायाभूत सुविधा बळकट करने.
२) बँक कार्यक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी बँक ऑपरेशन प्रक्रिया ऑप्टिमायझेशन करणे.
३) ग्राहकांच्या वेळ वाचवू शकता अशा सेवा प्रदान करणे आणि वक्तशीर ऑपरेशन कमी करण्यासाठी २४ * ७ एटीएम, रोख जमा मशीन्स इ उपलब्ध करणे
४) ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी व कामगार या घटकांना अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवून या स्पर्धेच्या युगात सक्षम करणे.
इतिहास: १९६०-७० च्या दशकात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हि आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व कामगार अशा तिनही घटकांना लासलगाव येथे रोजगार उपलब्ध होण्याची सोय होती. त्यावेळी व्यापार्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी व्यापारी बॅंकांची स्थापना होत होती व व्यापारी वर्गाला त्यातून आर्थसहाय्या मिळात असे. परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती खळावलेली होती, अशा शेतकरी व कामगार वर्गाला कुठलेही आर्थसहाय्य मिळत नसे. याच कारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती व सामाजिक राहणीमान आजूनही खालावत होते. सन १९६२-१९७२ या कालावधित लोकनेते दत्ताजी पाटील हे निफाड तालुक्याचे आमदार होते. जनसमान्यांचा नेता तसेच शेतकरी व कामगार मित्र असा त्यांचा नावलौकिक होता. तेव्हा 'जनसमान्यांचे हित' लक्षात घेऊन कै. लोकनेते दत्ताजी पाटील यांनी पुढाकार घेऊन 'जनता सहकारी बँक'ची स्थापना केली. अगदी सामान्य शेतकरी व कामगार यांना सभासद करून लोकनेते दत्ताजी पाटील यांनी सामान्यांसाठी आर्थिक सहाय्याचे दालनच उघडले. त्यांच्या समाजसेवी कार्यामुळे ०७/०१/१९९९ रोजी बॅंकेचे नामकरण 'लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि.,लासलगाव' असे करण्यात आले.
सामाजिक: सामाजिक सुधारणीसाठीच स्थापन झालेली असल्यामुळे अगदी सुरुवातीपासुनच आपल्या बॅंकेला नेहमीच सामाजिक जाणीव आहे व त्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील असते.
- लातूर येथे झालेल्या भूकंपानंतर, भूकंपग्रस्त लोकांसाठी आपल्या बॅंकेने मुख्यमंत्री सहायता निधीस भरघोस मदत दिली.
- 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' याची पूर्ण जाणीव असल्याने आपली बँक दरवर्षी नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असते.
- जनजागृती आणि समाज प्रबोधन घडण्यासाठी, लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिनांक २६ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान आपली बँक विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. १९९७ पासून दरवर्षी या कार्यक्रमांना परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असतो.
- यासोबतच परिसरातील कोणत्याही सामाजिक कार्यात आपली बँक नेहमीच पुढाकार घेत असते.