एनईएफटी
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी NEFT सेवा सुरु केली आहे. आता आपल्या बँकेतून NEFT व्यवहार शक्य आहे. नैशनल इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्स्फर (NEFT)
एक राष्ट्रव्यापी एकास एक निधी स्थानांतरण सुलभ करणारी भुगतान प्रणाली आहे. या योजने अंतर्गत व्यक्ती, पेढ्या आणि समुदाय कोणत्याही बँक शाखेतून देशात या योजनेत सहभागी असलेल्या
कोणत्याही इतर बँक शाखेत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्ती, पेढ्या आणि समुदायास इलेक्ट्रोनिक पद्धतीने निधी स्थानांतरीत करू शकतात. एनइएफटी (NEFT) साठी कोणतीही किमान किंवा कमाल राशी मर्यादा नाही. एनएफटी (NEFT) व्यवहार सुरक्षित, मितव्ययी आणि धनाचे जवळ जवळ वास्तवसमय स्थानांतरण आहे.
(टीप: आरबीआयच्या मार्गदर्शनानुसार एनइएफटी (NEFT) व्यवहारांसाठी आपल्या बँकेने विविध एनइएफटी (NEFT) सक्षम बँकांचे उपसभासदत्व घेतले आहे.)
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आरटीजीएस (RTGS) सेवा सुरु केली आहे. आता आपल्या बँकेतून आरटीजीएस (RTGS) व्यवहार शक्य आहे.
RTGS हा संक्षेप रियल टाइम ग्रोस सेटलमेंटसाठी वापरतात ज्याची व्याख्या "वैयक्तिकरीत्या आदेश्क्रमाधारित (नेटिंग विरहित) निधी स्थानांतरणाचा निरंतर (वास्तव समयी) निपटारा" अशी केली
जाऊ शकते. 'वास्तव समयी' म्हणजे सूचनांवर नंतर केव्हातरीपेक्षा त्या मिळाल्याबरोबर प्रक्रिया होणे; 'ग्रोस सेटलमेंट' म्हणजे निधी स्थानांतरण सूचनांचा निपटारा वैयक्तिकरीत्या होणे
(सुचानाक्रमानुवर्ती आधारावर).
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक आपल्या ग्राहकांना व्यापारी वित्त पुरवठ्यासाठी मदत करते. RDBI बँकेच्या समन्वयाने लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक सर्व प्रकारचा व्यापारी वित्त पुरवठा फलिते व सेवा पुरविते.
ई प्रशासनात पुढाकार व मुद्रांक शुल्क प्रदात्यांना सोय पुरविण्यासाठी, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई एसबीटीआर (eSBTR) प्रकल्प सुरु केला आहे.
प्रत्यक्ष करांचा (संस्था किंवा आय कर) भरणा आता आपल्या बँकेद्वारे शक्य आहे. आपल्या बँकेचे ग्राहक आयकर किंवा संस्था कर आपल्या बँकेतून बिनदिक्कतपणे भरू शकतात.
आपल्या बँकेने आपल्या शाखांमध्ये अंतर्गत (२४×७) एटीएम मशिन्स बसविलेले आहेत. म्हणून आपण रांगेत प्रतीक्षा न करता थेट पैसे काढू शकतात आणि शिल्लक रक्कम तपासू शकतात.
आपल्या बँकेने आपल्या लासलगाव शाखेत एक रोख भरणा यंत्र (Cash Deposit Machine) बसविले आहे. आता ग्राहक त्यांच्या खात्यात केव्हाही थेट पैसे भरू शकतात.
हे मशीन २४×७ कार्यरत राहणार असल्याने ग्राहक बँकेच्या कामकाजाच्या वेळेत रांगेत प्रतीक्षा करणे टाळू शकतात.
लोकनेते दत्ताजी पाटील सहकरी बँक लि. च्या सर्व शाखांमध्ये विविध आकाराचे लॉकर्स उपलब्ध आहेत. लॉकर्सच्या उपलब्धतेसाठी संबंधित शाखेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
आता धनादेशांचा निपटारा अत्यंत कमी वेळेत केला जाईल. आपल्या बँकेने धनादेशांचा निपटारा इलेक्ट्रोनिक पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या नवीन प्रणालीने कामकाजात सुधारणा व सुरक्षा साधनांमध्ये संवर्धन सुद्धा केले आहे.
आपल्या खात्यात कोणताही व्यवहार केल्यावर, ग्राहकास आपल्या नोंदविलेल्या मोबाईलवर आपोआप एक लघु संदेश मिळतो.